जळगाव : सध्या जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते. त्यानंतर आता शासकीय अधिकार्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाचा अकुंश न राहिल्याने त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात नित्याचेच झाले आहेत. गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा व चोरटी वाळू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
दरम्यान, एरंडोल हद्दीत गिरणा नदी पात्रा काठी १३ रोजी १च्या सुमारास मंडळ अधिकारी व पथक कारवाईसाठी गेले असता त्यांना जबर मारहाण केली. या प्रकाणी मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फि्यादीनुसार संशितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आता वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा तीव्र करण्याची वेळ आली असून, त्यानुसार पावले उचलण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.