“ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव और लोकतंत्र बचाओ” अंतर्गत भारतातील 567 जिल्ह्यात धरणे प्रदर्शन करण्यात आले.भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हाशाखेच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर, जळगाव येथे धरणे प्रदर्शन करण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चाचे खानदेश प्रभारी नितीन गाढे व जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम यांनी नेतृत्व केले.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम ईव्हीएम मशीनने निवडणुका घेण्यात आल्या.2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ईव्हीएम चा वापर केला. या निवडणुकीत मध्ये ईव्हीएम चा वापर करून घोटाळा केला अशी याचिका बीजेपीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली व तसे पुरावे सुप्रीम कोर्टात दिले. ईव्हीएम मशीनद्वारा निष्पक्ष भयमुक्त व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही असा निकाल आठ ऑक्टोबर 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने देऊन मशीन सोबत व्हीव्हीपीएटी मशीन लावावी असा निर्णय दिला.
शंभर टक्के व्हीव्हीपीएटी मशीन लावण्यात याव्या अशी याचिका सुप्रीम कोर्टात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दाखल केली.
24 एप्रिल 2017 रोजी या याचिकेनुसार शंभर टक्के व्हीव्हीपीएटी मशीन लावण्यात याव्या असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.परंतु काँग्रेसचे अभिषेक मनु संघवी यांनी पन्नास टक्के व्हीव्हीपीएटी मशीन लावण्यात याव्या अशी याचिका दाखल केली. ८एप्रिल 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने ही याचिका मंजूर केली व व्हीव्हीपीएटी मशीन मधील एक टक्के मतदानाची मोजणी होईल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. आणि लोकशाहीला तारणारी 100% व्हीव्हीपीएटी मशीन मधून निघणा-या चिठ्ठ्यंची पुर्नमतमोजणी पद्धतशीरपणे टाळण्यात आली.
लोकांचा आक्षेप ईव्हीएम मशीन वर आहे .आजही ईव्हीएम मशीन मधील मतांच्या आधारेच निकाल जाहीर होतो. ईव्हीएम मशीन मुळेच मतांचा घोटाळा होतो असा रोष भारतीय नागरिकांचा आहे. ईव्हीएम मशीन मधील मतांचा घोटाळा होऊ नये म्हणून वीवीपीएटी मशीन लावण्यात आल्या. व्हीव्हीपीएटी मशीन मधील शंभर टक्के बूथ वरील 100% मतांची मोजणी जर केली तर ईव्हीएम मधील केलेल्या मतांचा घोटाळा उघड होईल परंतु एक टक्केच मत मोजणी केली जाते. त्यामुळे घोटाळा उघड होऊ शकत नाही.
ईव्हीएम मशीन मधील मतदानासोबतच व्हीव्हीपीएटीतील निघालेल्या चिठ्ठ्यांची शंभर टक्के मोजणी करावी. या मुख्य मागणीसह 20 मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
*या धरणे आंदोलनात या सामाजिक व राजकीय संघटनांची प्रत्यक्ष सहभाग नोंदवुन समर्थन केले.*
मराठा सेवा संघाचे खुशालआप्पा चव्हाण ,मंगलाताई पाटील अशोक लालवंजारी, किरणभाऊ राजपूत, राहुल टोके ,डॉक्टर रिजवान खाटीक सर, राजू मोरे,सुनिल माळी (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) अमोल कोल्हे (छावा मराठा युवा महासंघ) अरुणाताई पाटील,विश्वासआन्ना सपकाळे ( काँग्रेस)फारुक शेख साहेब (जिल्हाध्यक्ष मनियार बिरादरी) ऐनोद्दीनभाई शेख (एम आय एम )नारायण सोनवणे, महेंद्र जोहरे ,योगेश सोनवणे (ग्रामपंचायत सदस्य) सुरेश धनगर(उबाठा शिवसेना),भागवत सुतार, रामकृष्ण चौधरी साहेब,(राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),विठ्ठल महाराज(धनगर महासंघ,), गोपाळ कोळी,भरत पाटील,अरुण तावडे,वाल्मिक कोळी (आदिवासी कोळी समाज),मुकेश कुरील(संविधान जागृती मंच)आदि मान्यवरांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दिला.
*या धरणे आंदोलनात विविध सामाजिक संघटनांच्या मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती…*
बहुजन क्रांती मोर्चा राज्य सहसंयोजक सुमित्र अहिरे , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ.शाकीर शेख,गनीभाई शाह,अकीलभाई कासार, बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक प्रमोद सौंदळे पाटील, बहुजन मुक्ती पार्टी खानदेश प्रभारी अमजदभाई रंगरेज, बहुजन मुक्ती पार्टी जळगाव शहराध्यक्ष विजयभाऊ सुरवाडे , खानदेश प्रभारी गोर बंजारा क्रांती संघ धनराज चव्हाण सर, भारत मुक्ती मोर्चाचे जाकीरभाई कुरेशी, राहुलभाऊ सोनवणे, सुनिल देहडे,सुकलालभाऊ पेंढारकर,सागरभाऊ भालेराव,सुनिल साळवे, राष्ट्रपालभाऊ सुरडकर, रघुनाथ घोडेस्वार सर , असंघटित बांधकाम संघाचे भगवान कांबळे सो.,संजयदादा कदम राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे अनिताताई पेंढारकर, दिपालीताई पेंढारकर, दिपालीताई सोनवणे,उषाताई निकम,आशाताई केदारे, विमलताई साळुंखे, मंगलाताई सपकाळे,मेघाताई इंगळे,सीमाताई सोनवणे, कल्पनाताई सपकाळे, उषाताई सपकाळ मिलिंद सोनवणे((उमाळे),अशोक सपकाळे (शिरसोली),कुंदन तायडे,एड.आनंद कोचुरे सर,पंकज तायडे,आनंद निकम,गजेंद्र सावरे,संजीव सोनवणे सर,(बहुजन क्रांती मोर्चा),भास्कर सोनवणे सो.,रामदास सुरवाडे,मंगेश बारसे, सिध्दार्थ तायडे,सतीषआप्पा मोरे,वासिमभाई तांबोळी,संजय जाधव,प्रदिप सदावर्ते,किरणभाऊ बि-हाडे,(सर्व आसोदा गाव), रमेश रंधे,(नशिराबाद), यादवराव बाविस्कर गुरुजी,आकाश दामोदर,रविंद्र सोनवणे,अमर गायकवाड,रवि नुतकाडे,कन्हैय्या मोरे,भास्करभाऊ पठार,जितेंद्र बि-हाडे सर, श्रीकांत बि-हाडे,श्रीकांत बाविस्कर ,हाजी रफिक शेख मुसा,नदिमोद्दीन काझी,साहिल पठाण, मल्हारी सरदार साहेब,अभिमन सोनवणे सो.,रामभाऊ सोनवणे,अमीन शेख सलीम, सिध्दार्थ सोनवणे (कानळदा),एस.सी.बि-हाडे,भाईदासभाऊ सपकाळे,उखाभाऊ सोनवणे(सावखेडा),सजन भालेराव सर,तुषार तायडे,नितीन मोरे,अक्षय तायडे,आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.