Jalgaon Politics : काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी कधीपासूनच सुरू केली आहे. त्यांनी आधी कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता जनसंपर्क मोहिम सुरू केली. यानंतर, मात्र त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. स्वत: एकनाथ खडसे यांनी अलीकडेच डॉ. केतकी पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असे भाकीत केले होते.
दरम्यान, आता डॉ. केतकी पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. पक्षाकडून रावेरमधून लढण्यासाठी आधी प्रवेश करून मग दावा करता येईल या हेतूने त्या भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे समजते. अर्थात, यातून त्या रावेरच्या जागेसाठी दावा पक्का करणार आहेत. साधारणपणे श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या नंतर त्यांचा प्रवेश होऊ शकतो.