पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्विप दौऱ्यानंतर भारतात मालदीव चर्चेचा विषय ठरलेले आहे. मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षपदी चीन समर्थक मोईजू यांची निवड झाल्यापासून दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंधात कटुता आल्याचे दिसत आहे. त्यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या दौऱ्याला जात आहेत. पण चीन दौऱ्याआधीच राष्ट्राध्यक्ष कार्यालयाची वेबसाईट बंद पडली आहे. याशिवाय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट्स देखील डाउन झाल्या आहेत. सरकारी वेबसाईडने काम करणे बंद केले आहे.
मालदीव सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाईट बंद पडल्यामुळे भारतात सुद्धा हा चर्चेचा विषय राहिला आहे. यादरम्यान “तांत्रिक समस्या” आल्याने काही काळासाठी वेबसाईट बंद पडली असल्याचे स्पष्टीकरण, मालदीवच्या सरकारने दिले आहे. लवकरात लवकर सर्वच सरकारी वेबसाईट चालू होतील, अशी आशा सुद्धा मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने ट्विट करत व्यक्त केली आहे.