अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनाची करोडो लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य घटकांना सूचना दिल्या आहेत. 22 जानेवारीला दिवे लावून दिवाळी साजरी करण्यासोबतच त्यांनी 9 दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यास सांगितले आहे. नड्डा यांनी या अजेंड्यावर काम करण्याच्या सूचना देणारे पत्र दिले आहे.