नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक गुड न्यूज आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भरती जाहीर करण्यात आलेली असून या भरती मार्फत तब्बल 5347 जागा भरल्या जाणार आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी ही भरती होईल. त्यानुसार या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
विद्युत सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. या पदासाठी वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
या पदांसाठी परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र