जळगाव,(प्रतिनिधी) हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू होऊ नये म्हणून देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संप पुकारला होता या संपामुळे संपूर्ण देशभरात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या संपामुळे काल दिवसभर अनेक शहरांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपांबाहेर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी संपाच्या भीतीने वाहनांमध्ये अधिकचे पेट्रोल भरल्याने काही पेट्रोल पंपांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली.तर दुसरीकडे संपामुळे सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक खूप अडचणीत सापडले होते. अखेर केंद्र सरकारचं आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात आल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान सर्व सुरळतीत व्हायला अजून एक दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
सरकारसोबत सकारात्मक चर्चा
हिट अँड रन कायद्याबाबत सरकार आणि वाहतूकदार यांच्यात समेट झाला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील चर्चा यशस्वी झाली आहे.ट्रक चालकांनी संप मागे घेऊन कामावर परतावे, असे परिवहन काँग्रेसने म्हटले आहे. परिवहन संघटनेने देशभरातील चालकांना संप मागे घेण्यास सांगितले आहे. सध्या कायद्याची अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी होईल, त्या वेळी संघटनेशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन संघटनेला सरकारकडून देण्यात आले आहे. यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
मोटर वाहन कायद्यांतर्गत Hit and Run Act हिट-अँड-रन प्रकरणांसाठी नवीन कायद्याला विरोध आहे. देशभरात मोठ्या वाहनांचे चालक संपावर असून रस्ते अडवून कायद्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी करत आहेत. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळी गृहमंत्रालयात परिवहन संघटनेची बैठक झाली. येथे आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट Hit and Run Act काँग्रेसचे अध्यक्ष मलकित सिंग बल यांनी सांगितले की, 106 (2) ज्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा आणि दंड आहे, तो कायदा लागू होऊ देणार नाही. आम्ही सर्व संघटनांच्या चिंता भारत सरकारपर्यंत पोहोचवल्या. नवीन कायद्याचा हेतू 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड असा आहे, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. भविष्यात या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, अशी ग्वाही आम्ही सर्व वाहनचालकांना देतो. संप मागे घ्यावा, असे आवाहन आम्ही केले आहे. सर्व वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांकडे परत यावे.
ते म्हणाले की, आम्ही भारतीय न्यायिक संहितेच्या मुद्द्यावर भेटलो आणि चर्चा केली, आता आम्हाला कोणतीही अडचण नाही. सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. Hit and Run Act नवीन कायद्यांची अंमलबजावणी झालेली नाही. कायदा लागू करण्यापूर्वी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा सल्ला घेतला जाईल.