महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपर्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक अश्वासक चेहरा म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी वसंतराव मुंडे यांचा वाढदिवस…
आपलं संपूर्ण आयुष्य लेखणीच्या माध्यमातून समाजासाठी आणि पत्रकार बांधवांसाठी वेचणार्या या ज्येष्ठ पत्रकाराचा खूप आदर वाटतो अशा व्रतस्थ पत्रकारांच्या आयुष्याकडं पाहिलं की, समाजासाठी पुढं सरसावणार्या लेखणी आणखी धारदार व्हायला लागतात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला वसंतराव मुंडे सारखं नेतृत्व लाभल्याने एक नवी दिशा मिळाली.
संघर्ष माणसाला आळस, निराशा आणि नकारात्मकतेपासून दूर ठेवतो असं म्हटलं जातं,जेव्हा एखादी व्यक्ती संघर्षातून आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करते तेव्हा ते अपयशी असूनही त्याला प्रेरणा देते. यामुळे माणसाची संघर्षाप्रती सहनशीलता आणि समर्पण वाढते…. अशाच संघर्षातून उभारलेलं संघर्षनायक वसंतराव मुंडे आहेत, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करण्यापासून तर आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेचे नेतृत्व करण्यापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास पत्रकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
पत्रकारांसाठी लढणारा माणूस
शहरातील असो की गाव खेड्यातील, दैनिकांचा असो की साप्ताहिकाचा, आपल्या संघटनेचा असो की इतर संघटनेचा यात कुठलाही भेदभाव न करता वार्ताहर पत्रकार, संपादक, वृत्तपत्राचे मालक, छायाचित्रकार या तमाम घटकाच्या न्याय, हक्क आणि प्रश्न घेऊन शासनदरबारी लढणारा माणूस म्हणून आम्ही वसंतराव मुंडेना पाहतो. कोरोनाच्या महामारीत सारं जग ठप्प झालं असतांना पत्रकारांसाठी धडपडणारा आमचा नेता पत्रकारांच्या लहान मोठ्या अडचणी सोडवत होते. राज्यभरातील पत्रकारांना व्यक्तिगत संपर्क करून अडचणीत जाणून त्यावर मार्ग काढले, पत्रकार संघाच्या शिलेदारांना सूचना व मार्गदर्शन करून हजारो कुटुंबाना किराणा किट व जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या तर महाड आणि चिपळून येथे पूरग्रस्त भागातील उध्वस्त झालेल्या परिवाराला थेट जीवनावश्यक वस्तू, किराणा, मेडिसिन पाठविण्यासाठी योजना आखली आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून पोहचवली यातून वसंतराव मुंडे यांच्यातील मानवी संवेदनाचे दर्शन होते.
वृत्तपत्रांची अर्थनीती बदलवीण्यासाठी धडपड
वृत्तपत्र जगातील असं उत्पादन आहे की त्याच्या उत्पादन खर्चा पेक्षा कमी किमतीत विकल्या जातं आणि त्यामुळं वृत्तपत्रांची आर्थिक गणितं बिघडत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली वृत्तपत्रांची ही अर्थनीती बदलली पाहिजे ही भूमिका घेत वृत्तपत्रांच्या किंमती वाढविण्यासाठी संपादक व वृत्तपत्र मालक यांच्या ‘गोलमेज परिषद’ घेऊन वृत्तपत्रांची अर्थनीती बदलणे काळाची गरज असल्याचे पटवून देत वसंतराव मुंडे यांनी क्रांतीचे पाऊल उचलले आहे.
वसंतराव मुंडे यांनी वृत्तपत्रांच्या आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सांगितलेले सूत्र अनेकांना पटल्याने आज राज्यातील बऱ्याच वृत्तपत्र मालकांनी वृत्तपत्राच्या किंमती वाढविल्या आहेत.
पत्रकारांचा बुलंद आवाज, संघर्ष, आक्रमकता,लोकप्रिय नेता सौंदर्यदृष्टीने सखोल ज्ञान असणारा प्रचंड बुद्धिमता,पत्रकारितेचा अप्रतिक ठोकतळा,कधी हि न मनाने हरणारा, न खचणारा भारदस्त आवाज ,राज्यातील पत्रकारांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असामान्य नेतृत्व म्हणून स्वाभिमानी व लढवय्या पत्रकारांची फळी उभी करणारे अशा संघर्षमय जीवन लाभलेल्या पत्रकारांच्या नेत्याला भावी वाटचालीस मोठं यश मिळाव ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…
प्रविण सपकाळे
संपादक – दै. नजरकैद
अध्यक्ष : उत्तर महाराष्ट्र विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ