बीड,(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी आज दिनांक २३ डिसेंबर रोजी बीड येथे मनोज जरांगे पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ असून यावेळी त्यांच्या चाहत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणारं आहे.
दरम्यान, सभेपूर्वी भव्य रॅली आयोजित करण्यात आलेली आहे रॅली संपून मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीड शहरातील पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून सभा सुरू होण्यापूर्वी सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी केली जाणार आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत असल्याने या सभेतून मनोज जरांगे २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.