पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा विक्री प्रकरणात आमदार किशोरअप्पा पाटील यांनी केलेल्या मागणी नंतर पाचोऱ्याचे तहसीलदार प्रविण चव्हाणके यांना आज दिनांक २० डिसेंबर रोजी निलंबित करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत घोषणा केली.
सविस्तर असे की, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची विवादीत जागा विक्री प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना या प्रकरणात एका मंत्र्याच्या दबावाखाली ५० लाखाचे आमिष घेऊन पाचोरा तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी विवादित बाजार समिती जागेचा ताबा दिल्याचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित करून तहसीलदार यांना निलंबित करण्याची मागणी केली त्यावर महसूल मंत्री यांनी तहसीलदार यांच्या निलंबनाची घोषणा करत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हायलाईट्स….
# जागा विक्री प्रकरणाला डीआरएटी कोर्टाचा ३१ जानेवारी पर्यंत ‘जैसे थे’ चा आदेश
# “शेतकऱ्यांची एक इंच ही जागा विक्री होऊ देणार नाही” या शब्दाला जागले आ.किशोर अप्पा पाटील ; शेतकऱ्यांची भावना
# बाजार समिती नफ्यात असतांना विक्रीचा घाट ?
# पडद्यामागून तहसिलदारांवर दबाव आणणारा मंत्री कोण ? शेतकरी व जनतेचा सवाल