चोपडा,(प्रतिनिधी)- राज्यात अनेकदा महसूल अधिकारी आणि माफियांमध्ये वाद होतांना दिसतात, वळूमाफियांची मुजोरी इतकी वाढली आहे,की महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूची वाहने चढवायला मागे पुढे पाहत नाहीत दरम्यान अशीच एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून समोर आली आहे.प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांचे खासगी वाहन (एम.एच.२० एफ. वाय. ०२१६) यांच्या वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली यात प्रांतधिकारी बालबाल बचावले असून किरकोड जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहेत.
प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे स्वतःच्या खाजगी वाहनाने जळगाव येथून चोपडा येथे येत असताना रस्त्यात अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रांताधिकारी भंगाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती कळविली. यानुसार या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला.तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितलं मात्र उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून ‘तू साइडला झाला नाही तर तुला उडवून देईन’ अशी धमकी दिली.
याच दरम्यान प्रांताधिकारी भंगाळे यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवून या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. तसेच तलाठी पावरा यांनीही ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले आणि ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल घेतली .यावेळी त्या अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे (वय२३, रा. खरग, ता. चोपडा) याने कारला धडक दिली.
सदर घटना मंगळवारी दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली.या धडकेमुळे प्रांताधिकाऱ्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत.