जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.
अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,
उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,
कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,
कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,
सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव
वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून चंदनकर नायब तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार उपस्थित होते.आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले
महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस आहे तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल..
तसेच महसूल विभाग हा प्रशासनाचा पाठीचा कणा असल्याने त्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून जिल्ह्याचा प्रशासनिक नावलौकिक मध्ये भर पडेल त्यासाठी सर्वंमिळून सामूहिक प्रयत्न करणार आहोत.. सर्व कर्मचारी यांची एकजुठ ठेवून दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात विचार असून इतर आणखी विधायक काम करण्याचा प्रयत्न राहील.
– नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे
हे देखील वाचा….
खळबळजनाक ; महाराष्ट्रासह देशभरात करणार होते बॉम्ब ब्लास्ट, त्या आधीच १० दहशतवादी ताब्यात ; एनआयए कडून ४४ ठिकाणी छापेमारी
‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ
राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ
महिला व बालविकास विभागाच्या ‘या’ ५ योजनांचा लाभ घ्या ; संपूर्ण डिटेल्स वाचा
पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..