बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असतांनाचं १० दहशतवाद्यांना पकडलं असून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही देखील जप्त करण्यात आले आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज शनिवार, दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळपासून एनआयए कडून ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
याठिकाणी केली छापेमारी
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.या कारवाईत भिवंडीच्या पडघा (Bhivandi) गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे.
देशभरात करणार होते बॉम्ब ब्लास्ट
धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.