शेती खरेदी करण्यासाठी १०० टक्के अनुदान शासन देत असल्याची योजना शासनाने आणली आहेत, तुम्हाला अशी योजना एकूण विश्वास बसत नसेल खरंच, पण ही योजना खरंच आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून सदर योजना राबवली जाते.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असं या योजनेचे नाव आहे. या योजने अंतर्गत लाभ घेतल्यास शेती खरेदीची संपूर्ण रक्कम अर्थात आता 100 टक्के अनुदान शासन देत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे शेतजमीन खरेदी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वतः समाजकल्याण कार्यालयात अर्ज करावा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रासह स्वतः समाजकल्याण कार्यालयात जमा करावेत. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क करावा.
या भूमिहीन शेतमजूरांना मिळेल लाभ
या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यास १०० टक्के अनुदान मिळणार आहे.या योजनेसाठी पात्र असण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, दारिद्रय रेषेखालील, भूमिहीन, त्याच गावचा रहिवासी आणि १८ ते ६० वयोगटातील असावा लागेल. गावातील पात्र लाभार्थी उपलब्ध नसतील तर लगतच्या इतर गावातील किंवा तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
कापूस विमाधारक शेतकऱ्यांना रूपये.72 कोटी 25 लाखाची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर
निवडणूक आचारसंहिता मोडल्याचा ठपका ; तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित ; पोलीस दलात खळबळ
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
#agriculture #farming #farm #farmer #farmlife #tractor #johndeere #fendt #agro #nature #agricultura #agriculturelife #farmers #landwirtschaft #agri #newholland #harvest #organic #global #photography #food #claas #masseyferguson #caseih #agricultureworldwide #agronomia #tractors #horticulture #r #agribusiness