जळगाव — प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सर्वसमावेशक पिकविमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत पात्र कापूस विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कापूस विमाधारक शेतकऱ्यांना प्रलंबित विमा रक्कम 72 कोटी पैकी 25 लाखाची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. विमाधारक शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील आपल्या निवेदनात पुढे म्हणाले की जिल्ह्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पिक योजनेत नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे या हेतूने योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या जोखमीच्या बाबी अंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid Season Adversity) या जोखमीच्या बाबींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.
या हंगामातील प्रतिकूल परिस्थितील उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीच्या व्यापक प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यातील संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर सदर जोखमीची बाब लागू करण्यात येते.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळातील विमाधारक शेतकरी यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केली होती.या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील 1,43,314 शेतकऱ्यांना रू.76 कोटी 40 लाखाची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आले होती. सदरील नुकसान भरपाई कापूस, उडीद,मूग,सोयाबीन, तूर, मका,ज्वारी इ. पिका करिता मंजुर करण्यात आली होती. अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.
यापूर्वी दि.ओरियंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे शेतकर्यांच्या खात्यात यपूर्वी खालील नमूद पिकांचे रूपये ४ कोटी २५ लाख जमा करण्यात आले असून पिकनिहाय शेतकरी आणी मिळालेली आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
????
उडीद पिकाचे २५९ शेतकरी रुपये ५९४८२८
????
मूग पिकाचे शेतकरी ९२० रुपये २३९६९२२
????
शेंगदाणे पिकाचे १६४ शेतकरी रुपये ४०७३४५
????
मका पिकाचे शेतकरी ८७२४ रुपये २७२९४३९९
????
बाजरा पिकाचे ७८४ शेतकरी रुपये १२३८२७९
????
तूर पिकाचे ५१८ शेतकरी रुपये १२६१३९५
????
तीळ पिकाचे शेतकरी ३३ रुपये १०५०६०
????
ज्वारी पिकाचे १३२५ शेतकरी रुपये ३१२९१3५
????
सोयाबीन पिकाचे शेतकरी १३५२ रुपये ६१३६२८१
पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा बाजूने निकाल
कापूस पिकाची 25 % टक्के अग्रिम भरपाई रूपये 72 कोटी 25 लाख देण्याबाबत विमा कंपनीने शासनाकडे अपील करून शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्याची मागणी केली होती
जळगाव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळातील मुख्यत: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई पोटी रुपये 72 कोटी 25 लाख मंजूर झालेले असताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई फेटाळण्याची अपील विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती सदरील सुनावणी अंती विभागीय आयुक्ताने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने विमा कंपनीने दि.23/11/2023 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पुन्हा अपील दाखल करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे दावे फेटाळण्याची मागणी केली होती. याबाबतची सुनावणी अंती मुख्य सचिव यांनी विमा कंपनीचे म्हणणे फेटाळत तात्काळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांची 72 कोटी 25 लाखाची नुकसान भरपाई अदा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी कृषि आयुक्त यांच्याकडे केलेल्या मागणीने नुकसान भरपाई देण्याचा मार्ग झाला सुकर
जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई तात्काळ देण्याबाबत खासदार उमेश दादा पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व वस्तुस्थिती आयुक्त साहेब यांच्यासमोर मांडून पिक विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने विमा कंपनीने राज्यस्तरीय अपील वेळी मांडलेले सर्व मुद्दे फेटाळण्यात आलेले असून तात्काळ नुकसान भरपाई देणे बाबतचे आदेश मुख्य सचिव यांनी विमा कंपनीस दिले आहेत.
पात्र महसूल मंडळ
????
भडगाव : भडगाव, कजगाव,कोळगाव
????
धरणगाव : धरणगाव, सोनवद
????
अमळनेर : अमळनेर, अमळगाव,भरवस,मारवड, नगाव,पातोंडा,शिरूड, वावडे
????
चाळीसगाव : चाळीसगाव,बहाळ,हातले, खडकी, मेहुणबारे, शिरसगाव,तळेगाव
????
यावल : फैजपूर, भालोद,बामनोद
????
रावेर : रावेर,खानापूर, निंभोरे
????
मुक्ताईनगर : अंतुर्ली