जळगाव,(प्रतिनिधी)- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने एल्गार पुकारला संपूर्ण राज्यभरा सभा, मोर्चे, आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून समाज आरक्षणाच्या मुद्यावर आग्रही असून त्या पार्श्वभूमीवर उद्या रविवार दिनांक ३ रोजी मनोज जरांगे-पाटील यांची सभा जळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान सभेच्या निमित्ताने समाजातील बंधू-भगिनींची मोटारसायकल रॅली आज शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी दहाला काढण्यात येईल.
असा असेल रॅलीचा मार्ग
काव्यरत्नावली चौकातून रॅली सुरू होऊन आकाशवाणी चौक, बहिणाबाई उद्यान, रिंगरोड-गोकूळ स्वीट, कोर्ट चौक-नेहरू पुतळा-टॉवर चौक-भिलपुरा-रथचौक-नेरीनाका-पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक मार्गे शिवतीर्थावर रॅली येईल. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून रॅलीचा समारोप होईल.
ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या धडकेत मोठा अपघात ; ३ महिला जागीच ठार तर २२ जण जखमी
पारोळा,(प्रतिनिधी)- ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे.ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली.
याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वाहने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.
या भीषण आपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) , चंदनबाई गिरासे (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.
हे पण वाचा.….
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
सभेच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाजाच्या बैठकी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पद्मालय विश्रामगृहात समाजाची बैठक पार पडली यावेळी बैठकीला सुरेंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, प्रमोद पाटील, गोपाल दर्जी, रवी देशमुख, माजी महापौर किशोर पाटील, सुरेश पाटील, संतोष पाटील, राजेंद्र देशमुख, राम पवार, दीपक चव्हाण, कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत श्री. जरांगे-पाटील यांची सभा आणि मोटारसायकल रॅलीची माहिती देण्यात आली.
जरांगेंचा सत्कार
बालगंधर्व खुले नाट्यगृहात रविवारी सायंकाळी सातला मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार आणि सभा होईल. त्याआधी साडेसहाला श्री. जरांगे-पाटील यांचे जळगावमध्ये आगमन झाल्यानंतर खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी चौकात स्वागत करण्यात येईल. शिवतीर्थावर अभिवादन करून ते सभास्थळी येतील.