पारोळा,(प्रतिनिधी)- ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे.ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली.
याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वाहने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.
या भीषण आपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) , चंदनबाई गिरासे (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.
हे पण वाचा.….
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून बचावकार्याला सुरूवात केली. दरम्यान, यावेळी रोडवरील दोन्ही बाजूची वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.