भुसावळ,(प्रतिनिधी)- प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर अशी एकमार्गी विशेष गाडी २ डिसेंबर रोजी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
क्र. ०२१०३ सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी शनिवार दि. २ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर,बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे असतील, या विशेष रेल्वेला १७ डबे असतील. यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.