शिक्षकाने आधी शिक्षक असणाऱ्या पत्नीचा गळा कापला त्यानंतर पोटच्या पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आणि यानंतर त्याने स्वत: गळफास घेत आत्महत्या करत स्वतःचेही जीवन संपवले ही घटना बार्शी शहरात उपळाई रोडवर घडली असून शिक्षकाच्या एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अतुल मुंडे असं शिक्षकाचं नाव आहे. पत्नीचं नाव तृप्ती मुंडे आणि ५ वर्षाच्या मुलाचं नाव ओम मुंडे असं आहे. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर तृप्ती या बार्शीतील एका शाळेत शिकवत होत्या. उपळाई रोडवर असलेल्या घरात ते राहत होते. वरच्या मजल्यावर दोघे पती पत्नी तर खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील राहत होते.
तिघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती बार्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.