पाचोरा,(प्रतिनिधी)- पत्रकार बांधव व त्यांच्या परिवारासाठी दि. ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मोफत रक्ततपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्ततपासणी व आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या परिवारासह लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राह्मणे, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा शाखा पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.