मुंबई,(प्रतिनिधी)- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत विधिमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना सुनावणी बाबत वेळापत्रक जाहीर करत सूचित करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाईल, अशी माहिती प्राप्त झाली असून संपूर्ण वेळापत्रकाच्या तारखा पुढे वाचा…
असे आहे वेळापत्रक…
१३ ते २० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार
– १३ तारखेला सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर सुनावणी पार पडेल
– दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल
– २० ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल
– २७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपापले म्हणणे मांडतील
– ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापली मुद्देसुद मांडणी करतील आणि दावे प्रतिदावे करतील
– १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी होईल
– २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल
– २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल
– सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल

