लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन तरुणींचे अपहरण करत त्यांना घरात डांबून ठेवत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी पीडित तरुणींची सुटका केली असून याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीच्या आईची फिर्याद…
याप्रकरणी पीडित तरुणी व अन्य एका पीडित तरुणीच्या आईने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून
दहा जणांविरुद्ध गुन्हा लोणावळा शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.याप्रकरणातील पहिल्या घटनेतील पीडित तरुणी ही मूळची धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील आहे. पंधरा दिवसांपूर्वी ती लोणावळा रेल्वे स्थानकाजवळील उभी असताना तिला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फूस लावत पळवून नेले. लोणावळ्याजवळील हनुमान टेकडी येथील क्रांतीनगर येथील एका घरात बांधून ठेवत तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दुसरी पिडीता उत्तर प्रदेशातील जाफरनगर येथील असून, तिलाही संशयितांनी पळवून नेत अत्याचार केले. पोलिसांना याबाबत कुणकूण लागताच त्यांनी पीडित मुलींची सुटका करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
बेताल आनंद पवार-सलट, मंदा बेताल पवार-सलट, संजना बबलू पवार-ठाकूर, बबलू पवार-ठाकूर, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे व करिना राज शिंदे, ज्ञानेश्वर लोकरे (सर्व रा. क्रांतीनगर, कुसगाव बु., लोणावळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.