जळगाव,(प्रतिनिधी)- मोटर सायकल चोरुन विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन LCB पथकाने एकुण ७,६०,००० /- कि.च्या एकुण १६ मोटार सायकली ताब्यात घेतल्या घेतल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सूचना केल्या होत्या.
त्यावरुन किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सपोनि श्री निलेश राजपुत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चोभे, सफी अनिल जाधव, पोह संदिप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल देशमुख, प्रितम पाटील, पो.ना. भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चापोना अशोक पाटील, चापोकॉ मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकुर सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पिंप्री सीम ता.एरंडोल येथील सुनिल भिल याचे कडेस चोरीच्या मोटार सायकल असल्या बाबत बातमी मिळाल्याने वर नमुद पथकाने सुनिल भिल यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने ३ मो.सा. काढून दिल्या असून त्याने सदरच्या मो.सा. ह्या नागदुली ता.एरंडोल येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्या कडून विना कागदपत्राच्या कमी रक्कमेच्या मो.सा. घेतल्याची कबुली दिली. त्यावरून नागदुली ता.एरंडोल येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी प्रत्येकी खुशाल पाटील यांचे कडे ८ मो.सा. व गोविंदा कोळी याचे कडे १ मो.सा. मिळाल्याने त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदर मो.सा.चे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे सांगीतले.
त्यानंतर पुन्हा सुनिल भिल याने कळविले की, मोहाडी ता.पाचोरा येथील हर्षल पाटील याचे कडेस ४ मो.सा. आहेत. त्यावरुन हर्षल पाटील यास ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने ४ मो.सा. काढून दिल्या आहेत. सदरच्या सर्व मोटरसायकली ह्या संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यांतुन चोरुन दाखल गुन्ह्यातील संबंधीत चारही संशयीतांना विकलेल्या आहेत.
आरोपी ०१) सुनिल शामराव भिल वय ३५ वर्षे रा. पिंप्री सीम ता.एरंडोल ०२) खुशाल ऊर्फे भैय्या राजु पाटील वय २७ वर्षे रा. नागदुली ता.एरंडोल ०३) गोविंदा अभिमन्यु कोळी वय ४५ वर्षे रा. नागदुली ता.एरंडोल ०४) हर्षल विनोद राजपुत वय २० वर्षे रा. मोहाडी ता.पाचोरा यांचे कडून एकुण ७,६०,०००/- रु. कि.च्या एकुण १६ मोटार सायकल मिळून आल्याने सदर मो.सा. चे पर्टीकुलर काढून जळगाव जिल्ह्याचे मो.सा. चोरीचे रेकॉर्ड चेक केले असता त्यापैकी १ मो.सा. बाबत जामनेर पो.स्टे. गुरक्र ४२९/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यात देण्यात आले असून उर्वरीत मो.सा. ह्या बुलढाणा, अकोला, अहमदनगर व गुजरात राज्यातील असल्याचे समजुन आले आहे.