म्हैसूर : काँग्रेस पक्षाने शब्द पाळला…. कर्नाटक राज्यात निवडणूकपूर्वी महिलांना महिन्याला २ हजार रुपये मदत दिली जाईल याबाबतचे आश्वासन दिले होते ते आश्वासन कर्नाटक काँग्रेस सरकारने पुर्ण केले असून या राज्यात लाखो महिलांना दरमहा २ हजार रुपये मिळणार आहे.आश्वासन पूर्ण केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटी आश्वासने देत नाही. कॉंग्रेस जे बोलते ते करून दाखवतो. कर्नाटकात केलेल्या कामाची संपूर्ण देशात पुनरावृत्ती केली जाईल, म्हणजेच देशात काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सरकार आल्यास कर्नाटक सारख्या योजना राबवल्या जातील असं राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे.
गृहलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना २ हजार
कॉंग्रेसने कर्नाटक राज्यात जनतेला निवडणूक दरम्यान दिलेली निवडणूकपूर्व आश्वासने पूर्ण केली आहेत आणि मुख्यमंत्री अन्नभाग्य १० किलो तांदूळ आदी योजना लागू केला आहे.आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली, या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल.महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार युवा निधी योजना बेरोजगार पदवीधरांना आणि डिप्लोमाधारकांना क्रमश: ३,००० आणि १,५०० रुपये अशी मदत केली जाणार आहे.