मुंबई : विदर्भातील अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी मंत्रालयात अचानक आंदोलन केले आणि आंदोलन दरम्यान काही आंदोलकांनी थेट मंत्रालयाच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या मात्र मुख्य इमारतीच्या चौकात असलेल्या सुरक्षा जाळी आधीच लावल्या असल्याने मोठा अनर्थ टळला मंत्रालयात झालेल्या अचानक आंदोलन,जोरदार घोषणाबाजीने मोठी तारांबळ उडाली पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
चार आंदोलकांनी मारल्या उड्या…
चाळीसहून प्रकल्पग्रस्त आंदोलक मंत्रालयात आले असल्याची माहिती आहे,जाळीवर चार आंदोलनकर्त्यांनी उड्या मारल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा करून १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच चाळीसहून अधिक आंदोलक मंत्रालयात आले. त्यांनी बॅगांमध्ये दोन ते अडीच हजार पत्रके आणली, बॅनरही आणले. तरीही सुरक्षा यंत्रणेच्या ते लक्षात आले नाही.
अपर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी घेण् आल्या आहेत. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदने देत आहोत. १०३ दिवसांपासून आमचे आंदोलन सुरु आहे. मात्र आमच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. आज मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित असल्याने आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

