जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्या नंतर पक्ष वाढविण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष वाढीवर भर देत आहे. शिंदे यांच्या शिवसेने सोबत अनेक दिग्गज नेते गेले असून अजूनही पक्ष प्रेवेश थांबलेले नाहीत. दरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेकडून जळगाव जिल्ह्यातील एरोंडल येथील ठाकरे गटाच्या नगरसेविकेला पक्षात येण्यासाठी फोन करण्यात आला होता. मात्र फोनवरच त्यांनी सडेतोड उत्तर देत ठाकरे गटात राहण्याचा निश्चय व्यक्त केल्याने मुंबई येथून थेट उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून शाबासकी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व त्यांच्या पत्नी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. कल्पना महजन यांच्या नावाने त्यांना ठाणे येथून शिंदे गटात येण्याबाबत फोन आला होता. त्यांचे पती दशरथ महाजन यांच्या क्रमांकावर हा फोन आला होता. त्यांनी आपली पत्नी ठाकरे गटात नगरसेविका आहेत असे सांगितले.
शिंदे गटात गेल्याचे आपल्याला तुमच्याकडून समजते आहे, तुम्ही माझे घर फोडत आहात असेही सांगितले. आम्ही ठाकरे गटातच आहोत असे त्यांनी ठणकावून सांगितले. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर खुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दाखल घेत थेट एरंडोल येथे दशरथ महाजन यांना रविवारी फोन केला व त्यांच्याशी संवाद साधला.