जळगाव,(प्रतिनिधी);- केसरीराज वृत्तपत्राचे संपादक भगवान सोनार यांनी आज भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस )पक्षांमध्ये आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील तसेच उत्तर महराष्ट्रातील अनेक आजी माजी राजकारणी दिग्गज प्रवेश करणार असून आगामी सर्व महापालिका,जिल्हा परिषद ,लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बीआरएस पक्ष स्वबळावर लढविणार असून पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणत पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा ठाम विश्वास उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला . याप्रसंगी जळगाव जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ (लकीअण्णा टेलर } यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी महापालिका,नगरपालिका, जिल्हा परिषद,विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये बीएआरस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून पक्षात आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
यांनी केला प्रवेश
आज बीआरएस पक्षाचे नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदा वाणी (वराड सिम) ,भूषण सोनवणे ,प्रा. सुरेश अत्तरदे , बिपिन झोपे ,भगवान सोनार , दीपक भारुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.