बीड,(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून चारित्र्यावर संशय घेत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात दांडा मारून पतीने खून करून स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा, असे सांगताच पोलिसांची धावपळ सुरू झाली.
ही घटना बीड़ तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली.मंगल गोडीराम भोसले वय ४५) असे मयताचे नाव असून गोडीराम हरिभाऊ भोसले (वय ५५) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मंगल या शेतात गेल्या होत्या. याचवेळी तेथे गोडीराम ही आला, त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच गोडीरामने बाजूला पडलेल्या दांडा पत्नी मंगलाच्या डोक्यात मारला यात पत्नीचा मृत्यू झाला.
मैत्री, प्रेम अन् अत्याचार; १७ वर्षीय मुलगी गर्भवती
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलिस ठाणे हद्दीत २१ ऑगस्ट रोजी धक्कादायक घटना उघडकीस आली असून पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे. अल्पवयीन मुलीशी ओळख झाली, त्याचे रूपांतर मैत्रीत झाले, नंतर प्रेम झाले अन् यातून युवकाने तिचे लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यातील आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभय दिवाकर पदा (१९, रा. बाजीरावटोला, भाकरोंडी) असे आरोपीचे नाव आहे. एका गावातील १७ वर्षीय युवतीला अभय पदा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यातून पीडित मुलगी गर्भवती आहे.