जळगाव,(प्रतिनिधी)- देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे जळगाव शहाराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे {राजूमामा} यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झेडांवदन करण्यात आले तसेच भारत मातेचे पूजन जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ह भ प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्तेकरण्यात आले.
या प्रसंगी आ राजूमामा भोळे यांनी देशासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्य वीरांना नमन केले.व केंद्रातील ,राज्य शासनाने केलेल्या जनकल्याण कारी योजनांची माहिती दिली. व देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जळगाव लोकासभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी यांनी पंचप्राण प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चा च्या वतीने भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आली होती.
सदर रॅली वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्राउंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला (पूतळ्याला) माल्यार्पण करून संपन्न झाली तिरंगा रॅलीत जळगाव लोकसभेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, शहर विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, गटनेते राजेंद्र घुगे पाटील,माजी महापौर सीमाताई भोळे, प्रदेश महिला चिटणीस श्रीमती. रेखाताई वर्मा, महेश जोशी, नितीन इंगळे,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या सह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व नगरसेवक, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांच्या ३ स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालय येथे अभिवादन..
देश्याचे माजी लोकप्रिय पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ३ ऱ्या स्मृतीदिनानिमित्त आज दिनांक १६ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी ०३:३० वा. भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे श्रद्धेय अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन भाजपा महानगर जिल्हाध्याक्षा सौ. उज्ज्वलाताई बेंडाळे , माजी महापौर सीमाताई भोळे, जेष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक उदयजी भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हापदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशी, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी ,प्रदेश महिला चिटणीस श्रीमती रेखाताई वर्मा, नगरसेवक धीरज सोनावणे , राजेंद्र मराठे, जितेंद्र मराठे, तसेच शहर विधानसभा विस्तारक राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, गणेश माळी, ललित बडगुजर, आनंद सपकाळे, जयेश भावसार, महेश कापुरे, अरुण श्रीखंडे, भाग्यश्रीताई चौधरी, धीरज वर्मा, कुमार श्रीरामे, मिलिंद चौधरी, स्वप्नील साकळीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .