Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ना.धों. महानोरांच्या आठवणींना दिला उजाळा

najarkaid live by najarkaid live
August 16, 2023
in Uncategorized
0
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि.16(प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक श्री. शरद पवार यांनी ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशन सि.लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डाॕ. सुधीर भोंगळे, विजयअण्णा बोराडे, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.

पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलालभाऊ जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना
साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. 1980 साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो. महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली.

रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना 1990-91 मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात हि कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही श्री. शरद पवार म्हणाले.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

Next Post

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे :शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला ; गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला पवारांची भेट

Related Posts

जळगाव महानगरपालिकेत ‘या’ ८६ पदांसाठी भरती ; तारीख, शैक्षणिक अहर्ता, पगार संपूर्ण डिटेल्स वाचा

September 28, 2023
योजना : केंद्र सरकार देणार घर खरेदीसाठी अनुदान !

September 26, 2023
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; शासनाकडून सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान मिळणार

September 22, 2023
चांदवड महामार्गांवर मोठा अपघात ; ५ जण ठार

September 18, 2023
एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्यात सामंजस्य करार ; प्रवाशांना होणार ‘हा’ फायदा

September 13, 2023
महाराष्ट्रातील ‘या’ पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

September 5, 2023
Next Post
वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे :शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला ; गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला पवारांची भेट

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करावे :शरद पवार यांचा अशोक जैन यांना सल्ला ; गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला पवारांची भेट

ताज्या बातम्या

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

आता शासनाचा ‘सेवा महिना’ उपक्रम ; समाविष्ट सेवांची संपूर्ण यादी वाचा, कसा घेणार लाभ… वाचा

September 29, 2023
जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी  –  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी –  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

September 28, 2023
तलाठ्यांकडील चकरा टळणार; ई-हक्क प्रणालीद्वारे करा अर्ज दाखल !

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा जल्लोषात साजरा

महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

धक्कादायक : पतीने दुसरं लग्न केलं ; पहिल्या डॉक्टर पत्नीने केली आत्महत्या

September 28, 2023
जळगाव महानगरपालिकेत ‘या’ ८६ पदांसाठी भरती ; तारीख, शैक्षणिक अहर्ता, पगार संपूर्ण डिटेल्स वाचा

जळगाव महानगरपालिकेत ‘या’ ८६ पदांसाठी भरती ; तारीख, शैक्षणिक अहर्ता, पगार संपूर्ण डिटेल्स वाचा

September 28, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us