सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात 302 रिक्त जागांची या आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आहे. ते महामंडळाच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
संपूर्ण राज्यभर केवळ 435 कर्मचाऱ्यांवर वखार महामंडळाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कामकाजात मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या 302 कर्मचारी भरण्यास परवानगी दिली आहे. येत्या 2 ते 4 दिवसांत कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
सत्तार पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना फायदा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे वखार महामंडळातून केले जाते. मात्र, महामंडळाकडे तुरळक मनुष्यबळ असल्याने 302 नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 ते 4 दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल, असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.

