तुम्हीही दहावी, आयटीआय पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे ते संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी नोंदणी करून घ्यावी.
पद संख्या – 37 पदे
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
आवश्यक पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023
वय मर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
मिळणारे वेतन –विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू होईल.
असा करा अर्ज –
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी (Mahapareshan Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक आहे. तसेच https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.
दि. 14 ऑगस्ट 2023 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.