जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले असून जुन्या वादातून तरूणाने एकावर गोळीबार केला. ही घटना आज गुरुवारी सकाळी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातीमा नगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील उर्फ सोपान चांदुसिंग परदेशी (वय-२५, रा.कुसुंबा ता.जि. जळगाव) यास अटक केली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
नेमकी घटना काय?
एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टर मधील प्रभा पॉलीमर कंपनीसमोर गुरूवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जुन्या वादातून स्वप्निल परदेशी यांनी गावठी गट्टा घेवून आकाश तवर यांच्यात शाब्दिक वाद झाला.
या रागातून स्वप्निल परदेशी याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाशवर २ वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात आकाशला कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांना गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी सोपान परदेशी याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस हस्तगत केले आहे.

