सांगली | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या एक अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात पाच महिलांची सुटका करण्यात आल्याची घटना सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ घडलीय.
सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून याबाबतची खातरजमा करण्यात आली. यानंतर पथकाने तिथे जात ही कारवाई केली. यात पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना या बाबतची टीप मिळाल्यानंतर सुरुवातीला डमी ग्राहक पाठवून या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. हा अड्डा चालविण्यास जागा देणारा विक्रम पंडित यास कल्याणकरला पोलिसांनी अटक केली असून अड्डयाचा एजंट इम्रान युनुस मुल्ला मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. या दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

