देशातील 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ऑगस्ट महिन्यातच वाढण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्रीय कर्मचार्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी संपूर्ण तपशील तयार करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात वित्त विभाग फिटमेंट फॅक्टरबाबत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पगार वाढेल
माहितीनुसार, सध्या कर्मचार्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळत असून, तो 3.68 टक्के करण्याची चर्चा आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येणार आहे. सध्या कामगारांना मूळ वेतन म्हणून १८ हजार रुपये मिळतात. एकूण पगाराची गणना मूळ वेतनवाढीच्या आधारे केली जाते.
अशी गणना करा
फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आता जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर तुम्हाला भत्ते वगळता 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680). किमान वेतन वाढवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण एक ना एक अडचण आल्याने हे प्रकरण रखडते. यावेळी फिटमेंट फॅक्टरबाबतची घोषणा निश्चित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे.