चाळीसगाव । चाळीसगावला हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच गावातील एका अल्पवयीन मुलीला धमकी देत भाड्याच्या खोलीत नेऊन अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी विर्धी संघर्षीत बालकासह भाड्याने खोली देणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास असून तिच्याच गावात राहणारा अल्पवयीन मुलाने तिच्याशी ओळख निर्माण करून मैत्री केली. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला आत्महत्या आणि घरच्या लोकांना फसवण्याची धमकी देवून तिला चाळीसगाव शहरातील एका भागात नेवून ५०० रूपये घेवून भाड्याच्या खोली नेते. तिथे त्याने पिडीत मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार त्याचे तीन वेळा केला.
दरम्यान, हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विधी संघर्षीत बालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर भाड्याने खोली देणाऱ्या दोन महिलांना देखील पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर विधीसंघर्षीत बालकाला बाल न्याय मंडळात रवाना केले तर अटकेतील महिलांना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.