पाचोरा(प्रतिनीधी)—उबाठा सेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा भडगाव तालुक्यातिल सर्वच गावांमध्ये सुमारे ५ हजार झाडांची लागवड करून त्यांचे संगोपण करण्याचा संकल्प उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पञकार परिषद घेउन बोलुन दाखवला.
शिवसेना शिवतिर्थ येथे घेण्यात आलेल्या पञकार परिषद प्रसंगी जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे,तालुका प्रमुख शरद पाटिल,युवासेना उपजिल्हा प्रमुख संदिप जैन,शेतकरी सेनचे जिल्हा प्रमुख अरूण पाटिल,रमेश बाफना,विलास पाटिल,अभिशेष खंडेलवाल,हरिष देवरे,मिथुन वाघ,नंदु पाटिल,शुभम पाटिल आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना वैशाली पाटील म्हणाल्या की,उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन पाचोरा भडगाव तालुक्यातिल सर्व ग्रामपंचायती आणी शासकिय कार्यालयांच्या आवारात निंब,वड आणी बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
वृक्षारोपणासोबतच त्या वृक्षाचे संगोपण करण्याची जबाबदारीही घेण्यात येणार आहे.सोबतच पाचोरा भडगाव ग्रामिण रूग्णालयातिल रूग्णांना फळवाटप आणी पक्षसंघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.सुमारे पाच हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे अवाहनही त्यांनी यावेळी केले.