रावेर ता.(प्रतिनिधी)- कारगिल युद्धात भारतीय सैनिकांचे मनोबल व देशासाठी बलीदान देण्याची तयारी असल्याने युद्धात यश मिळाले,हा विजय देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे.मॅक्रो व्हिजनमध्ये विद्यार्थी घडवतांना स्वावलंबी,देशभक्त नागरिक घडवायचे आहे. संस्थेत सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी सुध्दा शिकले पाहिजे.यासाठी प्रयत्न सुरु आहे.प्रदुषण कमी करण्यासाठी ई वाहनांचा वापर करावा असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले.
येथिल मॅक्रो व्हीजन अँकेडमी स्कुलमध्ये कारगील विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर स्कुलच्या गृप लिडरचा मान्यवरांनी सन्मान केला. कारगील युद्धाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. माजी सैनिक मनोहर बढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १९९९ कारगील युध्दाची माहीती दिली. देशाचे नागरिक मजबुत, त्या देशाचे सैनिक मजबुत असतात, भारताने केलेल्या अतुलनीय कमगिरीने राष्ट्र सक्षम आहे,सैनिकांजवळ अद्यावत शस्त्र आहे, म्हणून शत्रु देखिल भयभयीत आहे.पाकिस्तान त्यांच्या कर्माने महागाईच्या महामारीत जळत आहे.त्यांच्या कुकर्माचे फळ त्यांना मिळाले आहे. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्था अध्यक्ष श्रीराम पाटील, उपाध्यक्ष अँड. प्रवीण पासपोहे,खजिनदार विजय गोटीवाले,प्रमुख मान्यवर आरती बढे, माजी सैनिक बाळकृष्ण पाटिल,ड्रिप असो.चे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राजेद्र चौधरी, संस्थेचे प्रशासक किरण दुबे प्राचार्य दीपक महाजन उपस्थित होते. कर्यामाचे नियोजन शाळेचे क्रिडा शिक्षक हक सर यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे. आभार प्रदर्शन शाळेचे उप प्राचार्य जनार्दन धनगर( जे. डी सर) यांनी केले.

