भुसावळ । एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नसताना भुसावळातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील एका ३२ वर्षीय तृतीयपंथीवर मारहाण करत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
भुसावळ शहरातील एका भागात ३२ वर्षीय तृतीयपंथी वास्तव्याला आहे. भिक्षा व जोगवा मागून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान तिच्यावर पाच जणांनी जबरी केस ओढून अनैसर्गिकरित्याचा अत्याचार केला. त्यानंतर तिच्याजवळील दीड हजार आणि दररोजचा ७०० रूपयांचा खंडणीचा वाटा दिला नाही म्हणून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.
हे पण वाचा..
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना दिलासा ; मंत्री अनिल पाटलांनी दिले हे निर्देश
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! कुठे सिलेंडर तर कुठे गाड्या वाहून गेल्या, पहा हे भयानक VIDEO
पुणे हादरले ! पोलीस अधिकाऱ्यांने पत्नी आणि पुतण्याला घातल्या गोळ्या
या आठवड्यातील ‘या’ आहेत भाग्यशाली राशी, 7 दिवस पैशाचा पाऊस पडेल, तुम्हाला मिळेल मोठे यश!
मारहाण करणाऱ्यामध्ये तीन पुरूष, एक महिला आणि एक तृतीयपंथीचा समावेश आहे. दरम्यान पीडीत तृतीयपंथीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.