उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटातील विधानपरिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विट वरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली आहे. आ. मिटकरी यांनी अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक व्हिडीओ शेअर केला असून मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच ‘अजितपर्व’ असे कॅप्शन दिले. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री दिल्ली रवाना….
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही, अचानक ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा बंगल्याच्या परिसरात बॅनर झळकले
आज 22 जुलैला अजित पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा अजित पवार मुख्यमंत्री लिहलेला बॅनर लागल्याने बॅनर चर्चेत आले आहे. या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. वर्षा बंगलाच्या परिसरात अजितदादा पवार मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर झळकला आहे. जनतेच्या मनतील मुख्यमंत्री अजित पवार, असा आशय यावर लिहण्यात आला आहे.

