नवी दिल्ली । मणिपूरच्या घटनेने देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. मणिपूरमध्ये, दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर परेड केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने देशभरात रान पेटलं आहे. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर दुःख व्यक्त केले आणि केंद्र-राज्य सरकारला फटकारले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, हे मान्य नाही, जे व्हिडिओ समोर आले आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत. कठोर टिप्पणी करताना, CJI म्हणाले की या प्रकरणी मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती, अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्र आणि राज्याला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे.
हे पण वाचा..
नागरिकांनो काळजी घ्या..!! राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली धक्कादायक माहिती
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एसजी आणि एजी यांना या प्रकरणी कारवाई करण्यास सांगितले. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये जे काही दाखवले जात आहे त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत. हे मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांचे खुलेआम उल्लंघन आहे, आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देतो सुप्रीम कोर्ट आता या मुद्द्यावर 28 जुलै रोजी सुनावणी करणार आहे, ज्यामध्ये कारवाईची माहिती दिली जाईल.