रायगड – खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त गावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने सहा लोकांचा मृत्यू झाला असून 34 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बचाव कार्य सुरु आहे. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तब्बल 100 लोक या दरडीखाली दबल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे गाव दोन डोंगरांच्यामध्ये आहे. तरीही या गावाचा दरडप्रवण गावांच्या यादीत समावेश करण्यात आले नसल्याचे उघड झालं आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.