मुंबई(प्रतिनिधी)-धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना, पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन देण्यात आलेल्या नियुक्यात तात्काळ रद्द करा. सेवा भावी संस्था आणि संघटना नोंदणीचे स्वतंत्र कायदे आणि विभाग असताना चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव मंजूर करणार्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील संबंधितांची चौकशी करुन कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वसराव आरोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. राज्य पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देऊन रोष व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने 11 जुलै 2023 रोजी राज्य अधिस्वीकृती समितीवर 27 आणि 9 विभागीय समित्यांवर 45 सदस्यांची नेमणूक केली आहे. याच आदेशामध्ये मराठी पत्रकार परिषद या संघटनेवर प्रशासक नियुक्त असल्याबाबत धर्मादाय सहआयुक्त पुणे यांनी कळवले असल्याचे स्पष्ट केले असुन संघटनेचे राज्य समितीवर पाच आणि विभागीय समितीवर नऊ असे 14 सदस्य घेण्यात आलेले आहेत. याच पध्दतीने महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना तीन, महाराष्ट्र संपादक परिषद दोन, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ एक, बृह्नमहाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ एक, महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना एक आणि महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद एक असे सदस्य घेण्यात आले आहेत.
धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणीसाठी 1860 सोसायटी आणि 1950 ट्रस्ट कायद्यांतर्गत सेवाभावी संस्थांची नोंदणी केली जाते. तर असंघटित क्षेत्रात काम करणार्या मानधन, पगार घेणार्या कामगारांसाठी कामगार कायदा (लेबर युनियन अॅक्ट) 1926 अंतर्गत नोंदणी केली जाते. सेवाभावी संस्था आणि श्रमिक संघटनांसाठी स्वतंत्र विभाग आणि कायदे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागानेही कोणतीही खातरजमा न करता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना संघटना दाखवून चुकीच्या पध्दतीने अधिस्वीकृती समितीवर सदस्यांची नियुक्ती केली आहे. याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा आणि चुकीच्या पध्दतीने झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्थाव पाठवणार्यांवर कारवाई करावी अशा आशयाचे प्रातिनिधीक स्वरुपात निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वासराव आरोटे. यांनी काल संपूर्ण संघटनेचे वतीने राज्यभरातील विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत या घटनेचे सर्व माहिती यावेळी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आली याबाबत योग्य ती चौकशी करून चुकीचे काम करणाऱ्यांना कधीही पाठीशी घालणार नाही अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनी शासनाचे आपण कर्मचारी आहोत त्यामुळे अशा चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कधीही पाठिंबा देणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिका डायरी घड्याळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर, मराठवाडा वि.स.प्र.कुंडलीक वाळेकर,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष विसे आदी उपस्थित होते.

