नवी दिल्ली । दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरण अजूनही कोणी विसरले नाही. तोवरच दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अशाच हत्याकांडाची घटना समोर आली आहे. दिल्लीमधील गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या शरीराचे अनेक भाग विखुरलेले आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरली आहे.
दरम्यान, गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळील परिसरात नाकाबंदी लावून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून आसपास तरुणीच्या शरीराचे आणखी काही तुकडे मिळतात का, याची पाहणी पोलीस करत आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र किंवा काही पुरावे आढळतात का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
#WATCH | Delhi Police recovers the body of a woman, chopped into several pieces from near Geeta Colony flyover area. Police present at the spot.
More details are awaited. pic.twitter.com/F68RdUaifx
— ANI (@ANI) July 12, 2023
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ तरुणीच्या शरीराचे काही अवयव आढळून असल्याची माहिती मिळाली. तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. जमुना खादर परिसरात दोन तुकडे केलेले मृतदेह सापडले आहेत. मृत तरुणीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

