वाडी शेवाळे, ता. पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शांतीलाल नथमल जैन माध्यमिक विद्यालय वाडी शेवाळे येथे आज दिनांक ८ जुलै २०२३ रोजी इयत्ता पाचवीच्यावर्गात अध्ययन करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकात मोडणाऱ्या व मागासवर्गीय घटकात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन भाऊसाहेब श्री प्रकाश एकनाथ पाटील व मुख्याध्यापक श्री प्रताप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
इयत्ता पाचवीला एकूण 26 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ईश्वर बापु पाटील, भगवान पांडे,पत्रकार संतोष मोरे, बाळासाहेब पाटील, अरविंद प्रल्हाद पाटील आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

