लग्नाचं वचन देऊन सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे वचन पूर्ण न केल्यास बलात्कार ठरत नसल्याचा मोठा निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे भुवनेश्वरमधील एका तरुणावर असलेले बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
यावेळी ओडिशा हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात असं म्हटलं होतं, की जर एखाद्या व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले; आणि पुढे जाऊन हे लग्न होऊ शकलं नाही तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही.