मुंबई । महाराष्ट्रातील राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजेच उद्धव ठाकरे आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे. हा प्रवेश शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा..
गतिमंद मुलीवर शारीरिक संबंध निर्माण केले ; पीडिता राहिली गर्भवती, पारोळ्यातील धक्कादायक घटना
धक्कादायक ! जळगावात सुसाइड नोट लिहून 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील १३०० रेशन दुकानांतून ‘ही’ नवीन सेवा सुरू होणार
विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला होता. विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून कमी होणार आहे.

