जळगाव । जळगावमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धकाकदायक घटना उघडकीस आली. पोलिसांना दोन पानी सुसाइड नोट आढळून आली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील कृष्णाप्रिया अरुण पाटील (१५) ही शिक्षणासाठी जळगावातील काका-काकूंकडे राहत होती. ती दहावी शिक्षण घेत होती. आई-वडील लहान अपंग भाऊ आणि बहिणीसोबत गावी राहतात. शनिवारी ती काका-काकूंसोबत पेरणीसाठी गावी गेली होती. मात्र बुधवारी सकाळी ती एकटीच परत जळगावला आली. त्यानंतर तिने आपले जीवन संपवले.
हे पण वाचा..
जळगाव जिल्ह्यातील १३०० रेशन दुकानांतून ‘ही’ नवीन सेवा सुरू होणार
रावेर तालुक्यात पावसाचे थैमान! माजी नगरसेवकासह दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू
अंडरवेअरमधून सोन्याची तस्करी ; हा VIDEO पाहून तुम्हीही तस्करीवाल्याला सॅल्यूट कराल
Jalgaon : फेसबुकवर ओळख अन् तत्काळ विवाह ; नंतर बिंग फुटलं, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…
असा आहे चिठ्ठीमधील मजकूर
‘मी मरेल!, कारण काय मलाच माहीत नाही. एकटं एकटं वाटते. म्हणजे असे की जगून काहीच फायदा नाही. पण मी मरेल, मला माफ करा. मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच मरेल. पण काय करू? माझ्या विचारांचा पूर्णपणे घोळ झाला आहे. प्रत्येक क्षणाला २-२ विचार येतात. जगातील सर्व दुश्मन आहेत. मी कालच मरणार होती. पण हिंमत झाली नाही. आज हिंमत करेल आणि मरेल. मरावे असे काही कारण पण नाही. पण जगून काय मिळेल. सॉरी, पण तुमचे नाव बदनाम होणार नाही. आपल्या घरचं नाव बदनाम होण्याचे कारण पण नाही. अप्पाची ट्रीटमेंट राहून जाईल, अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे.