हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी एअरपोर्टवर सोन्याच्या पेस्टची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. आरोपीने हे सोनं आपल्या अंडरवेअरमध्ये लपवून आणले होते. जवळपास 20 लाख रुपयांचे हे सोनं आहे. हा प्रवासी शारजाहून प्रवास करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर बुधवारी कस्टम अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एक प्रवासी 331 ग्रॅम सोनं अंडरवेअरमध्ये लपवून तस्करी करत होता.
#WATCH | Customs officials at Hyderabad's Rajiv Gandhi International Airport have seized 331 gms of smuggled gold paste which was concealed inside an undergarment of a passenger travelling from Sharjah. The seized gold is valued at approximately Rs 20 lakhs.
(Video source:… pic.twitter.com/MRtGgL3xvD
— ANI (@ANI) July 5, 2023
पण त्याचा हा प्रयत्न फसला. एअरपोर्टवर पोहचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. आरोपीकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी अंडरवेअरमधील सोन्याची पेस्ट काढतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.