मुंबई : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचंही सांगितलं जात असून या सर्व चर्चांवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नसून अजित पवार मुख्यमंत्री होणार ही अफवा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात इतरांचा समावेश होणार आहे. खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
हे सुद्धा वाचा..
Jalgaon : फेसबुकवर ओळख अन् तत्काळ विवाह ; नंतर बिंग फुटलं, जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली…
आधी प्रेम, मग शरीरसंबंध सुरु, पण.. प्रेम कहाणीचा धक्कादायक शेवट
हतनुर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात येणार : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईत १३ जुलैपर्यंत जमावबंदी लागू : हे आहे कारण?
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्रीपदाला धोका असल्याचं सांगून नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहेत. जे घडलंच नाही. ते घडलं म्हणून क्रिएट करणं योग्य नाही. हा लोकशाहीतील घाणेरडा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्यांचेच आमदार संपर्कात
ठाकरे गटाच्या 13 पैकी 6 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यातील तीन चार आमच्या आमदारांनी मला फोन केला. मुंबईऐवजी इतर राज्यात भेटू असं त्यांनी सांगितलं. चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे विनायक राऊत यांनी सांगितलेला आकडा त्यांच्याबाबतीतील खरा आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

